महाराष्ट्र
शिक्षकांविषयी अपशब्द वापरणार्या लोकपत्राच्या संपादकास क्रांतीसेनेचा दणका; जाहीर माफी मागण्यास पाडले भाग
औरंगाबाद प्रतिनिधी : लोकपत्र या दैनिकाचे संपादक रवींद्र तहकीक यांनी मास्तरड्यानों जरा जास्त काम केले तर मराल का ? या मथळ्याखाली अग्रलेख लिहून त्यांनी गरळ ओकली होती.आज त्यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला,यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ऑफिस दणाणून सोडले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,यावेळी समस्त शिक्षकांची माफी मागण्यास या संपादकांना भाग पाडले व यानंतर अस करणार नाही असे वदवून घेतले.
यावेळी अखिल भारतीय क्रांतिसेनेचे अध्यक्ष संतोष तांबे पाटील,प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख,महानगर अध्यक्ष दिनेश दुधाट,युवा अध्यक्ष औदुंबर देवडकर,कामगार आघाडी प्रमुख राजू शेरे,उपाध्यक्ष दीपक गायकवाड,पैठण तालुका उपाध्यक्ष गणेश औटे,विद्यार्थी अध्यक्ष विशाल तांबे,गजानन खाडे, ऋषीकेश नवथर,अमोल देशमुख व इतर पदाधिकारी हजर होते.
आपला
नितीन देशमुख
प्रदेश सरचिटणीस
अखिल भारतीय क्रांतिसेना
9923555275