राजकीय
अखिल भारतीय क्रांतीसेना पक्ष,MESTA संघटना व इतर संघटनेचे संयुक्त उमेदवार संजयराव तायडे पाटील यांना प्रथम पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन
मतदान करूया…
मराठवाडा पदवीधर मतदार संघाचा निवडणुक कार्यक्रम झाहीर झाला आहे.अखिल भारतीय क्रांतीसेना पक्ष, MESTA संघटना व इतर संघटनेचे संयुक्त उमेदवार संजयराव तायडे पाटील यांना प्रथम पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले पाटील यांनी केले आहे.
दि.1 डिसेंबर रोजी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान आहे.अखिल भारतीय क्रांतीसेना पक्ष यांच्या वतिने अनेक आंदोलने केली आहेत आणि जनतेला न्याय मिळवून दिला आहे,आणि पुढेही देतं राहू.असे यावेळी रघुनाथ भोसले पाटील यांनी सांगितले.
अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाने केलेली ठळक कामे
• आत्महत्या केलेल्या शेतकर्यांसाठी मदत
• सामान्य जनतेच्या आरोग्य सेवेसाठी तत्पर सेवा आणि मदत देण्यात येतात.
• महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी आंदोलने
• पिक विमा मिळवून देण्यासाठी आंदोलने आणि यश
• सरकारी अन्याय कारक ठरलेला धोरणा विरुद्ध कायम आवाज उठवून सामन्यासाठी आणि न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने केली.
• दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलने करून यश
• अनेक ठिकाणी खराब रस्त्याच्या दुरूस्ती साठी आंदोलने आणि यश
• विज बिल कमी करणे आणि माफी साठी आंदोलने
• अनेकांची बँकेतील असलेले कामे, तहसील कार्यालय येथे असलेले कामे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्य असलेली कामे केली आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस कार्यालयात प्रलंबित अडचणी सोडवल्या आहेत.
• शाळा आणि महाविद्यालयातील वाढत्या फिस् मधे सवलती मिळवून दिल्यात
• अनेक गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवून दिले.
• रक्तदान शिबिर आयोजित करून जीवन वाचवण्यासाठी स्वतःचे रक्त देणारे दाते या क्रांतीसेनेत आहेत
• अनेक बेरोजगारांच्या कर्ज फाईल पूर्ण करण्यासाठी मदत करणारे
या आणि यासारख्या विविध कामात हक्काचे लोक म्हणजे क्रांती सैनिक होय!
अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष तांबे पाटील यांच्या कुशल नेतृत्व आणि मार्गदर्शनात समाजाच्या आणि युवकांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या अखिल भारतीय क्रांतीसेना पक्ष व MESTA याच्या वतिने उभा करत असलेला उमेदवार हा आपला हिताचा असेल. मराठवाडा पदवीधर मतदार संघामधून अखिल भारतीय क्रांतीसेना पक्ष, MESTA संघटना आणि इतर विविध संघटनांचे संयुक्त उमेदवार मा. संजयराव तायडे पाटील निवडणूक लढवणार आहेत,तरी आपल्या हक्काचा माणुस पदवीधर आमदार म्हणून पाठवायचा आहे. तरी सर्व पदवीधर मतदारांनी संजयराव तायडे पाटील यांनाच प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करा.
आपलाच हक्काचे आमदार निवडून येण्यासाठी आपले अमूल्य प्रथम पसंतीचे मतदान करा.
आपलाच जनसेवक
रघुनाथ पाटील भोसले
अखिल भारतीय क्रांतिसेना
मराठवाडा अध्यक्ष