महाराष्ट्र
आ.मेघना बोर्डीकर यांच्या उपोषणाला अ.भा.क्रांतिसेना पक्षाचा पाठींबा
परभणी प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भाजपाच्या वतीने दिनांक 2 नोव्हेंबरपासून जिल्हा कचेरीसमोर आ.मेघना बोर्डीकर यांनी सुरू केलेले उपोषण आज बुधवरीसुद्धा सुरूच आहे. दरम्यान, अखिल भारतीय क्रांतिसेना पक्षाने या उपोषणाला पाठींबा दिला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गोविंद इक्कर पाटील यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष संतोष तांबे यांच्या मार्गदशनाखाली अ.भा.क्रांतिसेना पक्ष हा सामान्य जनता व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात लढत आहे. भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुरू केलेले आंदोलन महत्वाचे असल्याने आम्ही आ.मेघना बोर्डीकर यांच्या उपोषणाला पाठींबा देत असल्याचे जिल्हाध्यक्ष गोविंद इक्कर यांनी सांगितले.
परभणी जिल्ह्यात सतत अवकाळी पावसामुळे सोयाबीन ,कापूस, तूर, मूग, ज्वारी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महा विकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्यास सुलतानी निकष लावून परभणी जिल्ह्यातील 70 टक्के खरीप क्षेत्र मदतीपासून वंचित ठेवण्याचा डाव आखला आहे.जिल्ह्यातील 51 मंडळातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान व पिक विमा मिळवण्यासाठी भाजप परभणीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनांचा मुख्य भाग म्हणून भाजपा आमदार युवा नेत्या आ.मेघना साकोरे बोर्डीकर ह्या सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. या वेळी दत्तात्रय सावत, आशिष राऊत, वंसत गोरे भैया बारखुदे , ज्ञानेश्वर इक्कर , सुरज कहात , श्रीरंग पांडे , विवेक यन्नावार , राजन अंबटी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.