उपयुक्त माहिती
“लीडर” मध्ये हे गुण असणे आवश्यक आहेत
1) दूरदृष्टी (vision) :
लीडरने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते.
2) ध्येयनिश्चिती (Goals):
लीडरने आपल्या पुढे काही ध्येय निश्चित केली पाहिजेत.
3) आत्मविश्वास (Self Confidence) :
ध्येयावर असलेला जबरदस्त विश्वास आणि निष्ठा ही नेतृत्वाची खरी शक्ती असते.
4) अनुशासन (Discipline):
एक चांगला लीडर एक चांगली अनुशासीत व्यक्ती असणे आवश्यक आहे.
5) चिकाटी (Persistance):
कोणत्याही कामामध्ये विजय मिळविण्यासाठी लीडरच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि चिकाटी असणे आवश्यक असते.
6) नियोजन (Planning):
नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे ध्येय गाठण्यासाठी योजना तयार असाव्या लागतात. आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी नियोजन व पूर्व तयारी करण्याची जबाबदारी लीडरलाच पार पाडावी लागते.
7) योग्य निर्णय (ProperJudgemen t):
लीडरला सर्वांची बाजू ऐकून , सर्वांचे हित पाहून योग्य निर्णय घेतला पाहिजे.
8) धैर्य (Patience):
नेतृत्व करताना लीडरला चौकटी बाहेरच्या काही गोष्टी अमलात आणाव्या लागतात. त्यासाठी नेत्याकडे धैर्य असावे लागते.
9) जबाबदारी स्वीकारणे (Accept Responsibilitie s):
नेतृत्व हे जबाबदारी स्वीकारणारे असले की टीमची कार्यक्षमता वाढते व कामाचे समाधान मिळते.
10) बदलाचा स्वीकार (Accept changes):
बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असतांना , आपल्या बदलाचा वेग मंदावला असेल तर… नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असे समजावे.
11) मार्गदर्शक व प्रशिक्षक व्हा (Be A Coach & Guide):
प्रत्येकाला त्याच्या आवाक्यातलं आणि क्षमतेच काम वाटून दिल पाहिजे.प्रसंगी मार्गदर्शन आणि त्या त्या विषयाचे ज्ञान दिले पाहिजे.
12) आकर्षक व्यक्तिमत्व (Pleasing Personality):
एक लीडर म्हणून तुमच्यावर , तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येय धोरणांवर लोकांनी विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी सहकाऱ्यांशी सतत संवाद राखायला पाहिजे.
13) प्रशासनिक कौशल्य (administrative skills):
एक लीडर म्हणून त्याच्या जवळ प्रशासनिक कौशल्य असणे गरजेचे आहे.
14) संभाषण कौशल्य (Communication skills):
एक चांगला लीडर बनण्यासाठी सर्वात मोठी कला हवी असते ती म्हणजे संभाषण कौशल्याची क्षमता.
15) निर्णय घेण्याची कला (Decision making ability):
एक लीडर म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेता आला पाहिजे.
16) जोखीम घेण्याची क्षमता (Risk Taking Ability):
नेतृत्व करताना धैर्याबरोबरच जोखीम घ्यायची तयारीसुद्धा लीडर मध्ये असली पाहिजे.
17) क्रिएटिव्हिटी, संशोधन आणि प्रेरक (Creativity and Innovation):
हि कौशल्य लीडर मध्ये असली पाहिजेत.
18) समस्या सोडविण्याचे कौशल्य (problem solving skills):
खऱ्या लीडरची ओळख तेव्हाच होते जेंव्हा तो आपल्या समस्यांचा सामना कसा करतो यावरूनच.
19) लवचिक आणि अनुकूल क्षमता (Flexibility And Adaptability):
लीडर म्हणून नेहमी लवचिक व अनुकूल राहता आले पाहिजे.
20) वेळेच्या व्यवस्थापणाचे कौशल्य (Time Management Skills):
लीडरला जर आपले ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी वेळेचे नियोजन केलेच पाहिजे.
21) लोकांना प्रोत्साहित करा ( Motivate People):
लीडर ने आपल्या लोकांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे.
22) आपण स्वतः आधी कार्यप्रवण होणे. (Lead By Example):
कोणत्याही लीडर ने फक्त सूचना न देता स्वतः पुढाकार घेऊन कामाची दिशा आणि आखणी तयार करावी.
23) टीम प्लेयर्स व्हा ( Be Team Players):
लीडर ची प्रमुख जबाबदारी आहे की एक चांगली टीम तयार करणं आणि त्या टीमचा एक भाग बनणे.