कृषी
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यात यावी यासंदर्भात पैैैठण तहसीलला निवेदन देताना अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे कार्यकर्ते.
पैठण : नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पैठण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात आज अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.
सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मका,बाजरी, सोयाबीन,मुग,उडीद व इतर पिकांना मोड फुटले व पुरामुळे गोदावरी नदी काठच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.यामुळे संपुर्ण औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.निवेदन देताना पैठण तालुका प्रमुख लक्ष्मण शेलार,तालुका उपप्रमुख गणेश औटे,शहर युवक प्रमुख गणेश डुलगज, विद्यार्थी आघाडी शहरप्रमुख सिद्धार्थ बागुल,शहर सरचिटणीस वि.आ.चिराख फारुक,सर्कल प्रमुख पिंपळवाडी प्रविन आडसरे,प्रतिष्ठाण महाविद्यालय शाखाप्रमुख ओंकार गोन्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते.