सामाजिक

स्वातंत्र्यदिनी ऑनलाईन भाषण स्पर्धा संपन्न!

आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,पैठणचा अनोखा उपक्रम

पैठण: 74 वा  स्वातंत्र्य दिन वर्धापनाचे औचित्य  साधून सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन च्या माध्यमातून भाषण देण्यासाठी उपस्थिती दर्शविली. अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भाषण देखील केले, कोरोणामध्येही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सणापासून वंचित न राहता ऑनलाइन पद्धतीने घरी बसूनच मोठ्या उत्साहात 74 वा वर्धापन दिन आनंदाने साजरा केला.
 ध्वजारोहन विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संतोषजी तांबे, मुख्याध्यापक आर. बी. रामावत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एम.के.कोळगे, ज्येष्ठ नागरीक श्रीमंतराव तांबे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे झेंडावंदन थेट प्रक्षेपण करत विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग नोंदवला. यानिमित्ताने घेतलेल्या भाषण स्पर्धेचे शिक्षिका सारिका धोकटे, पुनम जगताप, माधवी कोष्टी यांनी प्राथमिक विभागातुन स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थीचे परिक्षक म्हनून तर कविता दसपुते, वैशाली गिरगे, सोनाली आव्हाळे यांनी माध्यमिक विभागाचे परीक्षण केले. लवकरच  विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके दिली जाणार आहेत. ऑनलाईन स्पर्धा यशस्वीतेसाठी हर्षदा मुळे, सुनील खोलासे, सिद्धार्थ औरंगे, अभिजीत निंबाळकर,संदीप तांबे, ऋषी नवथर, कैलास देशमुख, निलेश देशमुख आदींनी विशेष परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button