सामाजिक

वीज देयके माफ करण्याची ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी

अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले पाटील यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना पाठवलेल्या ई-मेल द्वारे वीज देयके माफ करण्याची मागणी केली आहे.
 परभणी : राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असुन, या काळात हाताला काम नसल्याने नागरिकांचे जगने मुश्किल झाले आहे.अशी परिस्थिती असताना घरगुती वीज देयक कुठुन भरावे,असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळेच पुढील तीन महिन्याचे वीज देयक शासनाने माफ करावे,अशी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले पाटील यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे ई-मेल द्वारे मागणी केली आहे.
    सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील सर्व जनता त्रस्त आहे, त्यातच लाॅकडाऊन मुळे अनेकांचे उद्योग, व्यवसाय बंद आहेत,अनेकांच्या नोकर्यावर गदा आली.त्यामुळे अनेक कामगार,नोकरदार,शेतमजुर बेरोजगार  झाले,सध्याच्या संकटकाळात अनेकांची कमाई कमी झाली आहे,तर काहींची बंद आहे, अशातच विजबिलाचा भार डोईजड झाला असुन,सध्दस्थितीत शेतकरी कामगार नोकरदार विज बिल भरण्यास असमर्थ आहे.त्याच प्रमाणे शेतकर्याच्या मालालाही लाॅकडाऊन मुळे वेळेवर बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने भाजीपाला,फळबागांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत एकीकडे पोटाचा प्रश्न उद्भवत असताना  दुसर्या बाजुला मात्र शेतकरी, कामगार, नोकरदार व्यापारी वर्ग,छोटे -मोठे उद्योग शेतकरी यांना विज देयकाबाबत तगादा लावल्यास ही बिले कुठुन भरतील हा प्रश्न सर्वांच्या मनात भीतीदायक जाणवत आहे.यापुढे घरगुती वीज देयक भरायचे झाल्यास ते कुठुन भरावे हे भरण्यासाठी जनतेकडे पैसे नाहीत, त्यामुळे पुढील तीन महिण्याचे वीज देयक महाराष्ट्र शासनाने माफ करावे व कुणाचाही वीजपुरवठा खंडित करू नये.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button