राजकीय
दिपक राजे शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ” प्रदेश प्रवक्ते ” पदी निवड
श्रीगोंदा / सुभाष दरेकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शंभुसेना प्रमुख दिपक गणपतराव राजे शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ” प्रदेश प्रवक्ते ” पदी निवड करण्यात आली.
दिनांक २५ जुलै रोजी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश प्रवक्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकी दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवड केल्याचे जाहीर केले.
बैठकीस ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीस आ. अदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा सौ. विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेस सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक गणपतराव राजे शिर्के, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार चेतन तुपे, आ. प्रकाश गजभिये, उमेश पाटील, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस कोशाध्यक्ष हेमंत टकले, निरज महानकाल, राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव आदींसह पक्षाचे प्रदेश पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.