कृषी

जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शेतकरी, विद्यार्थी व प्राध्यापक रवाना

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकर्यांसाठी सौर उर्जा सिंचन योजना या विषयावर तीन दिवसांच्या क्षमता विकास प्रशिक्षणासाठी जबलपुर- मध्येप्रदेश येथे बोरलॉग इंन्स्टिट्युट ऑफ साउथ एशिया (बीसा) या संस्थेत 30 प्रशिक्षणार्थींची पहिली तुकडी रवाना झाली आहे.
या तीन दिवसाच्या प्रशिक्षणात बोरलॉग इन्स्टिट्युटचे प्रमुख डॉ. पंकज सिंह व त्यांचे नवी दिल्ली येथील सहकारी परेश शिरसाठ हे प्रशिक्षण देणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या सूचनेनुसार व अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कास्ट-कासमचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकरी यांच्यासाठी सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी जाणार्या या पहिल्या तुकडीच्या बसला संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी निरोप दिला.
यावेळी डॉ. शरद गडाख म्हणाले की या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारच्या सिंचन पध्दतींमध्ये केलेला सोलरचा उपयोग या संबंधीचा अभ्यास करता येणार आहे. यामुळे सहभागी झालेल्या शेतकर्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांच्या संपर्कात येणार्या इतर शेतकर्यांमध्येही सौर उर्जेचा सिंचन पध्दतींमध्ये होणार्या वापराविषयी जागृती होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी कास्ट प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार, सहप्रमुख डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते. सदरील प्रशिक्षणासाठी गेलेल्या तुकडीचे नेतृत्व डॉ. सुनिल कदम करत आहेत.

Related Articles

Back to top button