अहिल्यानगर
कृषी जैवतंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे उपयुक्त – डॉ.शुभांगी साळोखे
प्रवरानगर – शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा विद्यार्थ्यांना साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमा अंतर्गत लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक आभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येते.
तसेच आज २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जग गतीने प्रगती करीत आहे. आता चार भिंतीतील शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांमध्ये व्यापक व्यावसायिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे महत्वाचे उपयुक्त ठरतील असा विश्वास कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे यांनी व्यक्त केला.
त्याच अनुषंगाने संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा सहा दिवसीय आभ्यास दौरा हैदराबाद येथे आयोजित केला आहे. यामध्ये हैदराबाद मधील सेन्टर फॉर सेल्लूलार अँड मॉलेक्युलर बायोलॉजि (CCMB), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशन (NIN), इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमीअरेड ट्रोफिक (ICRISAT) तसेच प्रोफेसर जयशंकर तेलंगणा स्टेट ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी राजेंद्रनगर हैद्राबाद येथील प्रसिद्ध इन्स्टिट्यूट ला भेटी देऊन तेथील सखोल ज्ञान घेणार आहे.
सदर विद्यार्थी शैक्षणिक आभ्यास दौरा पूर्ण करून त्याचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ञ समिती समोर मांडणार आहे. शैक्षणिक सहल व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.चंदन डिपके आणि प्रा. स्वरांजली गाढे आदींनी विशेष परिश्रम घेत आहे.