पश्चिम महाराष्ट्र
२६ नोव्हेंबर रोजी भूमी फौंडेशनच्या वतीने जागतिक संविधान दिन
वाघोली [प्रतिनिधी] : दिनांक २६ नोव्हेंबर रोजी जागतिक संविधान दिन असल्याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन देशात साजरा करण्यात येतो. त्याप्रमाणे शासनाच्या आदेशाप्रमाणे समाजात संविधान बाबत जनजागृती व्हावी म्हणून भूमी फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने झूम मिटिंग व्दारे सायंकाळी ६ वाजता ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रमुख अतिथी पुणे जिल्हा न्यायालय विधिज्ञ परवीन शेख यांचे माझे संविधान माझा अभिमान या उपक्रमावर मार्गदर्शन करणार आहेत.
संविधान हा कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया नसतो. असंख्य भाषा जाती पंथ धर्म असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वाना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणारे भारतीय संविधान दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण करण्यात आले. म्हणून आज अशा कार्यक्रमास झूम मिटिंगव्दारे सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रा.कैलास पवार व संस्थेचे पदाधिकारी यांनी केले आहे.