साहित्य व संस्कृती

साहित्यिक आणि कलावंत संस्कृती रक्षक-कवी, गीतकार बाबासाहेब पवार

श्रीरामपुर (बाबासाहेब चेडे ) : साहित्यिक आणि कलावंत हे संस्कृती रक्षक असून त्यांची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता वाढली पाहिजे, त्यांचे कार्य आणि परिचय होण्यासाठी लवकरच ‘साहित्यिक, लोककला कलावंत परिचय पुस्तक ‘ प्रकाशित करणार असल्याचे मत लोककला कलावंत, साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक, अध्यक्ष कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांच्या परिषद कार्याचा आणि परिचय पुस्तक निर्मिती प्रारंभाबद्दल डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सन्मान केला. त्याप्रसंगी कवी, गीतकार बाबासाहेब पवार बोलत होते. डॉ. उपाध्ये यांनी आजच्या ग्रामीण भागातील, साहित्यिक, कलावंत स्थितीगतीचा आढावा घेतला. साहित्यिक आणि कलावंत परिचय डायरी ही काळाची गरज आहे.
श्रीरामपूर शहराची 1947 पासूनची जडणघडण हा विषयदेखील हाताळणे गरजेचे असल्याचे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले. कवी, गीतकार पवार म्हणाले, आमची परिषद अनेक उपक्रम हाती घेत आहे. लोककला कलावंत आज दुर्लक्षित आहेत. त्यांना योग्य व्यासपीठ, मानधन आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठी संमेलन घेणार आहे असेही कवी पवार यांनी सांगितले. डॉ. उपाध्ये यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button