अहिल्यानगर
मुख्यमंत्री रस्ता नामकरण विधी आंदोलन रद्द
राहुरी प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : केंदळ बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र ते तारडे वस्ती रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. याबाबत मागील आठवड्यात तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे नाव रस्त्याला देऊन नामकरण विधी या गांधीगिरी आंदोलनास महसूल विभागाच्या मध्यस्थीने स्थगीत करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष विशाल तारडे व ग्रामस्थांनी दिली आहे. राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक येथील २७ जूलै रोजी होणार्या नामकरण विधी या गांधीगिरी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले हरिभाऊ डोंगरे, समीर तारडे,सुनिल गोसावी ,रामेश्वर कैतके, सुरेश मच्छिंद्र तारडे, लहू तारडे, रंगनाथ कैतके, भाऊसाहेब मांगुडे, नवनाथ भोसले ,नामदेव कैतके, आकाश तारडे, संजय तारडे ,महेश तारडे, योगेश तारडे, कैलास मांगूडे ,अण्णासाहेब तारडे,मोहन तारडे, प्रल्हाद तारडे ,बाबासाहेब गोसावी नामदेव कैतके ,अरुण मांगुडे आदींनी घेतला होता.याबाबतचे निवेदन तहसीलदार फिसोउद्दीन शेख यांना देण्यात आले होते.यावर तात्काळ महसूल मंडलाधिकारी भाऊसाहेब मेहेत्रे व कामगार तलाठी राहुल क-हाड यांनी पाहणी करून रस्त्याशी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल.आंदोलकाना आंदोलनापासून परावृत्त करत आंदोलन स्थगित केले आहे.
” तहसिलदार यांच्या आदेशानुसार केंदळ बुद्रुक या रस्त्याची प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून ग्रामस्थांचे म्हणणे लेखी स्वरूपात तहसीलदार यांच्याकडे पाठवले आहे. त्यावर तहसीलदार निर्णय घेतील.”
~ भाऊसाहेब मेहेत्रे ( मंडलधिकारी ब्राम्हणी )