अहिल्यानगर
दरडगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा
अहमदनगर/ जावेद शेख : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरडगाव थडी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बांधवांनी कठोर परिश्रम घेतले. जेष्ठ नेते गंगाधर जाधव पाटील, लेखिका मनिषा ताई पट्टेकर यांनी खूप मोलाचे विचार मांडले. गावचे सरपंच आण्णा खामकर, विलासनाना जाधव, उत्तमराव बर्डे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष तात्याभाऊ ढगे, बापूसाहेब माळी, विष्णू खामकर,आण्णासाहेब रोकडे, पत्रकार बापूसाहेब रोकडे, अहमदभाई सय्यद, बापूसाहेब जाधव, मंगेश दोंदे, पत्रकार शिवाजी झावरे, शरद रोकडे, बापूसाहेब रोकडे, दादाराम जाधव, बाबासाहेब हारदे, सुभाष गलांडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुत्रसंचलन राठोड सर, पाहुण्यांचे स्वागत अंत्रे सर, अध्यक्ष निवड पोटे सर, अनुमोदन भांडकोळी सर, शिंदे यांनी मानले. सर्वांचे आभार मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिति यांनी केले.