महाराष्ट्र
गोवा सरकार तर्फे बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ. प्रविण निचत यांना पुरस्कार
अहमदनगर/ जावेद शेख : संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृह, मंगळवार पेठ, बी वार्ड, कोल्हापूर येथे गोवा सरकार ने बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर प्रविण निचत ह्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अपवादात्मक कामगिरी केलेल्या अनेक धाडसी कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र गोवा एकता वैद्यकीय सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय मंत्री आयुष मंत्रालय, भारत सरकार श्रीपाद नाईक, गोव्याचे माजी ग्रामविकास मंत्री जयेश साळगावकर, ग्लोब्रज ग्रुप ऑफ कंपनीचे विलास कोळी, कला व सांस्कृतिक संचालनालय, गोवा संचालक सगुन वेलीप, प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था, कोल्हापूरचे अध्यक्ष प्रशांत जोशी, स्वागताध्यक्ष तथा साई आर्टस् गोवा अध्यक्ष बालचंद्र उजगावकर, समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग संचालक प्रा. डॉ. बी एन खरात व इतर उपस्थितांसमोर डॉ. प्रविण निचत ह्यांना महाराष्ट्र गोवा एकता वैद्यकीय सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून केल्याबद्दल त्यांच्या कार्याची वेगवेगळ्या संस्थांनी दखल घेऊन जवळपास 160 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे होप फाउंडेशन मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे. ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचारचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर “घरगुती उपाय” सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र गोवा एकता वैद्यकीय सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.