कृषी

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी घेऊन जावे-अ‍ॅड. भूषण बऱ्हाटे

अहमदनगर/जावेद शेख : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. इंदिरा गांधी या उत्तम प्रशासक, उत्तम नेता व कुशल नेतृत्व देनाऱ्या पंतप्रधान होत्या. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी स्वातंत्र्य सैनिकांसाठी आलाहाबाद येथे वानर सेनेची स्थापना केली. भारत देश अणुशक्ती संपन्न देश व्हावा यासाठी त्यांनी कार्य केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हाळगाव या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अहमदनगर जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बऱ्हाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतीय संविधानाच्या मूलभूत कर्तव्याचे पालन करणे हाच राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्तम प्रशासक, उत्तम नेता व कुशल नेतृत्व हे गुण जन्म घेतात. भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर घेऊन जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.मिलिंद अहिरे उपस्थित होते. त्यांनी इंदिरा गांधी यांचे कर्तुत्व व राजकीय कार्यकाळ विशद केला. भारत देशामध्ये खूप मोठी विविधता आहे. देशांमध्ये एकूण २२ भाषा बोलल्या जातात,धर्म व जाती मध्ये भेद करून देशविघातक शक्तींना फूट पाडण्याचीसंधी देवू नये. देशाचे सार्वभौम जपले पाहिजे, देशविघातक शक्तींना पाठबळ देऊ नये व राष्ट्रीय एकात्मता टिकवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता अखंड राहीली पाहिजे याची दक्षता घ्यावी, त्यासाठी महापुरुषांचे चरित्र वाचले पाहिजे ही अपेक्षा भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनी डॉ. मिलिंद अहिरे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयामध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी दूरदृश प्रणालीद्वारे घेताना सुरुवातीला महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे स्वागत केले व राष्ट्रीय एकात्मता दिनाची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. कीर्ती भांगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक महेश जाधव व संस्कृती सनस यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या बाबतीत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या डॉ. प्रेरणा भोसले, सौ.अंजली देशपांडे, सौ.वैशाली पोंदे, सौ. सासवडे, अमृत सोनवणे, अनिल शेळके हे दुरदृश प्रणालीद्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनोज गुड यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ.चारुदत्त चौधरी यांनी मानले.

Related Articles

Back to top button