अहिल्यानगर

ओबीसीच्या राहुरी शहराध्यक्षपदी शेख तर उपाध्यक्षपदी बागवान

अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते रियाज अजिजोद्दीन शेख यांची ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राहूरी शहराध्यक्षपदी तर शहर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अयाज शफी बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांच्या आदेशान्वये तथा ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन अहमदनगर जिल्हाध्यक्ष हाजी फय्याजभाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली ऑर्गनाईझेशनचे राहुरी तालुकाध्यक्ष उबेद अब्दुलसलाम बागवान यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनची राहुरी शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी तालुका उपाध्यक्ष नूर अत्तार, तालुका कार्याध्यक्ष नावेद बागवान, आयुब इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान, जिल्हा संघटक जाकीरभाई शाह, जिल्हा सरचिटणीस इब्राहिम बागवान, जिल्हा कार्याध्यक्ष आरिफभाई कुरेशी, जिल्हा सहसचिव अजिजभाई अत्तार, शब्बीरभाई (राजु) कुरेशी, उत्तर सचिव शाहिद खान, सहसचिव शकील शेख आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button