सामाजिक
छावा संघटनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांसाठी सुविधा शिबीर
श्रीरामपूर /बाबासाहेब चेडे : उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर येथे अपंग व्यक्तींसाठी सरकारी सुविधा देणे, जनजागृती करणे यासाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने शिबीर घेण्यात आले होते.
त्यावेळी अपंगाना ५० पिण्याच्या पाण्याचे बाटलीचे बॉक्स, बिस्कीट आदी वाटप करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय प्रमुख डॉ बंड व हॉस्पिटल स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित यादव, केदार यादव, विशाल तायड, डॉ गौरव कदम, ललित गवारे, बंटी यादव, गणु चिकणे, प्रतिक वर्पे आदी उपस्थित होते.