अहिल्यानगर

आरडगावात ना. तनपुरेंच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी- नगर- पाथर्डी मतदार संघात गेल्या १० वर्षपासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबीत होता. तालुक्यातील रस्त्याच्या प्रश्नात लक्ष घालून मला मिळत असलेल्या निधीतील ७० ते ८० टक्के निधी हा रस्त्याच्या कामासाठी वापरत असून जनतेच्या दृष्टीने महत्वाचा असलेला दळण वळणाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनामुळे विकास कामाना निधी मिळण्यासाठी अडचण येत असली तरी मिळणारा निधी हा विकास कामांसाठी वापर करुन येत्या उर्वरित कालावधीत कामे मार्गी लावण्यात येतील असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
राज्यमंत्री तनपुरे हे तालुक्यातील आरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स, परिचारिका तसेच पत्रकारांचा सन्मान व गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुरेश झुगे हे होते. यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, पंचायत समितीचे गट नेते रवींद्र आढाव, डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक भारत तारडे, बाजार समितीचे संचालक सुभाष डुक्रे, युवा नेते अनिल इंगळे, दिलीप इंगळे, रामदास वने आदि प्रमुख उपस्थित होते.
ना. तनपुरे पुढे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव न घेता  विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधकांना सत्ता गेल्याचे मोठे शल्य आहे. त्यामुळे ते केंद्र सरकारच्या काही संस्थेद्वारे महाराष्ट्रातील सत्ताधा-यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार पाडण्याच्या ते रोजच वल्गना करत आहेत माञ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा सरकार पाच वर्षाचा कार्यकाल हा पुर्ण करील असा विश्वास ना. तनपुरे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात रस्त्याचे आणि डीप्यांच्या कामाचा मोठा बॅकलाॅग होता म्हणून मी रस्ते आणि डिपीसाठी जास्तीत जास्त निधी देत आहे. आगामी काळात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून देखील अनेक रस्त्याचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आरडगाव येथे  सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळण्यास मदत होईल. म्हणून प्रलंबित असलेली अनेक विकास कामे येणाऱ्या काळात प्रामाणिकपणे मार्गी लावणार असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले आहे.
यावेळी सरपंच कर्णा जाधव यांनी स्वागत करून गावातील विकास कामांचा आढावा घेतला तर सदस्य माजी उपसरपंच सुनील मोरे यांनी गावातील काही प्रमुख अडचणी सांगून कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी उपसरपंच आशाताई वने, कैलास झुगे, रमेश वने, प्रमोद झुगे, आनंद वने, रेवणनाथ शेळके, विलास धसाळ, अशोक म्हसे, प्रमोद बोरावके, जयदीप लोखंडे, सहादु झुगे, बाळासाहेब म्हसे, जालिंदर काळे, मच्छिन्द्र भुसारे, गोरक्षनाथ खडके, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या शाखा अभियंता चोभे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हंचे, ग्राम विस्तार अधिकारी भिंगारदे आदि उपस्थित होते.
त्या बातम्या बिनबुडाच्या…..
     गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याच्या बातम्या ऐकल्या परंतु या सर्व बातम्या बिनबुडाच्या आहेत. इकडून-तिकडे उड्या मारणा-यांना पक्ष स्थान देत नाही तर राष्ट्रवादी पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी मिळते त्यामुळे त्यांनी त्याच्यामधे… त्या ठिकाणी… केविलवाणा प्रयत्न करूच नये. आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष योग्य व्यक्तीलाच उमेदवारी देईल अस स्पष्ट करत ना.प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिलेंच्या पक्ष प्रवेशाची चर्चा पुर्णपणे फेटाळली आहे.

Related Articles

Back to top button