साहित्य व संस्कृती
माणसाला माणुसपण देण्याचे काम साहित्य करते- प्राचार्य देवढे; ‘शब्दगंध’ ची शेवंगाव बैठक संपन्न
शब्दगंध शेवंगाव शाखेच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक हरीचंद्र नजन, राज्य प्रतिनिधी म्हणुन विठ्ठल सोनवणे यांची निवड करण्यात आली.
राहुरी / बाळकृष्ण भोसले : माणसाला माणूसपण देण्याचे काम साहित्य करते,म्हणून साहित्यिक चळवळीशी नवोदितांनी जोडून घेतले पाहिजे, शब्दगंध नवोदितांना ऊर्जा देण्याचे काम करत आहे, असे मत प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या शेवंगाव तालुका शाखा स्थापनेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महात्मा सार्वजनिक वाचनालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक विठ्ठल सोनवणे हे होते. तर जेष्ठ रंगकर्मी सुभाष जाधव, बापूसाहेब गवळी, राजेंद्र झरेकर, नाट्य परिषदेचे शाखा अध्यक्ष उमेश घेवरीकर, संस्थापक सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत इ मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य देवढे म्हणाले कि,’कोणत्याही चळवळीत काम करतांना सातत्य ठेवले तर यश हमखास येते, प्रामाणिक प्रयत्न असतील तर लोक सोबत येतात.’ यावेळी सुभाष जाधव, विजय हुसळे, विद्या भडके, सुरेश शेरे, उमेश घेवरीकर, बापूसाहेब गवळी यांनी शेवंगाव मध्ये साहित्यिक चळवळ वाढण्यासाठी शब्दगंध शाखेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील असे मत व्यक्त केले. बैठकीच्या सुरुवातीला शाहिर भारत गाडेकर यांनी गीत सादर करून चैतन्य आणले. प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले तर शेवटी हरिभाऊ नजन यांनी आभार मानले.
कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे :अध्यक्ष – हरिचंद्र नजन.सचिव – प्रा.सुरेश शेरे.कार्याध्यक्ष – शहाराम आगळे.उपाध्यक्ष – विजय हुसळे, पुनम राऊत.सह सचिव – तुकाराम जाधव, विद्या भडके.खजिनदार – राजेंद्र झरेकर.प्रसिद्धी समन्वयक – महेश लाडणे.कार्यकारणी सदस्य– शितल हिवाळे, सुनील वाघूम्बरे, वैभव रोडी, वसंत बडे, अभिजीत नजन.सल्लागार – बापुसाहेब गवळी, सुभाष जाधव.
यावेळी पार्वतीबाई गोसावी सार्व. वाचनालय, वरूर, महात्मा सार्व. वाचनालय, शेवंगाव, भारदे हायस्कूल ग्रंथालय व अमरापूर येथील ग्रंथालयास प्रत्येकी २०००/- रु ची पुस्तकं शब्दगंध प्रकाशनच्या वतीने भेट देण्यात आली. बैठकीस शिवशाहीर कल्याण काळे, हमीद सय्यद, विश्वास गाढे, रितेश गेरी, कल्याण भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.