आरोग्य

हिरडगावकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता?

श्रीगोंदा/सुभाष दरेकर : तालुक्यातील हिरडगाव येथील जंबुबेटावर दलित वस्ती सुधारणा अंर्तगत चालू असलेले भुमीगत गटार पाईपलाईनचे काम आराखड्यानुसार न करता अन्य ठिकाणावरून चालू आहे. परंतु गटारीचे पाणी पाइपलाइन द्वारे जेथे सोडण्यात येणार आहे, तेथुन काहीच अंतरावर पंधरा वर्षांपासून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा ग्रामपंचायतीचा बोअरवेल आहे. या ठिकाणी सांडपाणी सोडल्यानंतर जवळच असलेल्या बोअरवेलचे पाणी दुषित होण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक पाहता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने भुमिगत गटार पाइपलाइनचे पाणी हे पिण्याच्या पाण्याच्या उगम असलेल्या बोअरवेल पासून दुर असले पाहिजे होते. 
गावातील सांडपाणी या बोअरवेल पासून दुर सोडणे गरजेचे असताना ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे हिरडगावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच गटार पाइपलाइनचे खोदकाम आराखड्यानुसार केले नसल्याचे आढळून आले आहे तर काही ठिकाणी पाईप तुडलेल्या अवस्थेत आहे. असे काम चालू असताना या कामाकडे ग्रामपंचायत का डोळेझाक करीत आहे, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
चालू असलेल्या गटार पाईपलाईनचे पाणी पिण्याच्या बोअरवेल जवळ सोडण्याची व्यवस्था केली जात आहे. यामुळे भाविष्यात ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. 
_सौ. जयश्री ससाणे ( ग्रामपंचायत सदस्य )

चालू गटार पाइपलाइनचे काम आराखड्यानुसार न करता अन्य ठिकाणी चालू आहे. काही ठिकाणी हे सिमेंट पाईप फुटलेले अवस्थेत आहे. निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे. पाइपलाइन च्या कामाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 
_सौ. संगीता भालचंद्र दरेकर ( माजी सरपंच हिरडगाव )

सरपंच आम्हाला विचारात न घेता मनमानी कारभार करत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय असलेल्या इंधन विहिरी जवळ हे गटार पाइपलाइनचे पाणी सोडून पिण्याचे पाणी दुषित करून हिरडगावच्या नागरिकांचे आरोग्य ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे धोक्यात येणार आहे. 
_योगेश दरेकर पाटील ( उपसरपंच हिरडगाव )
 
पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल जवळ सांडपाणी सोडल्यामुळे नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून हे गटार पाइपलाइनचे पाणी अन्य ठिकाणी सोडण्याचा आग्रह ग्रामसभेत धरणार आहे.
_संदीप काळे ( आरोग्य सेवक हिरडगाव )

चालू असलेल्या कामाला आमचा विरोध नाही परंतु सांडपाण्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी, नियोजित आराखड्यानुसार वस्तीवरील नागरिकांना विश्वासात घेऊन केले पाहिजे. ग्रामपंचायत निधीचा योग्य मार्गाने उपयोग केला पाहिजे.
_सौ. मनिषाताई शिंदे (मा. सरपंच हिरडगाव)

गावचा सरपंच नामधारी नसावा. तो स्वत: कार्यक्षम असेल तर असे प्रकार होणार नाही.
_सौ. सुनिता राजेंद्र दरेकर ( मा. उपसरपंच, हिरडगाव)

Related Articles

Back to top button