अहिल्यानगर
गुरुकुल एज्युकेशन, सातारा व छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने अमित कोल्हे यांचा सन्मान…!
संगमनेर/बाळासाहेब भोर : गुरुकुल एज्युकेश सातारा संचलित गुरुकुल एज्युकेशन, अहमदनगर या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दिव्य धारा ग्लोबल मार्केटिंग प्रा. लि. चे CMD अमित कोल्हे यांना कोविड योद्धा सन्मान प्रदान करण्यात आला.
शहागड : छावा क्रांतिवीर सेनेचा समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना अमित कोल्हे.
तसेच स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत छावा क्रांतिवीर सेनेच्या मेळाव्यातही श्री. कोल्हे यांना सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यात अल्पावधीतच त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला असून दिव्य धारा ग्लोबल मार्केटिंग प्रा. लि. च्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळवून देण्याचे कामं केलं आहे. कोरोनासारख्या महामारीत अनेक उद्योग व्यवसाय डबघाईला आले असताना अनुकूल परिस्थिती नसतानाही त्यांनी दिव्य धारा कंपनीच्या माध्यमातुन मार्केटिंग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.