शिक्षणवारी ज्ञान पंढरी
प्रवरेच्या कृषी व कृषी सल्लग्नित महाविद्यालयात प्रवेश समुपदेशन केंद्र कार्यान्वित
लोणी प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील चार कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी व कृषी सल्लग्नित व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठीची सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया दि.५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु झालेली असून प्रवेश प्रक्रिया नोंदणी अंतिम दि.१८ नोव्हेंबर २०२१ आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सर्व प्रवेश महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या गुणावर आधारित गुणवत्ता यादीनुसार निश्चित होणार आहे.
सदर प्रवेश प्रक्रिया सदर्भातील विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी प्रवरेच्या कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयात समुदेशन केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.
या केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरणे, संकेस्थळावर (https://ug.agriadmissions.in/) अचूक माहिती नोंदविणे, कागतपत्रांची पूर्तता, महाविद्यालय पर्याय भरणे, प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक व संस्था स्तरावरील प्रवेश या विषयी मार्गर्शन करण्यात येत आहे. तसेच प्रवेश फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या माहिती पुस्तकाची प्रत पालकांना उपलब्ध केली असून सुविधा केंद्राचा फायदा सर्व पालकांनी घ्यावा असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांनी केले.