शिक्षणवारी ज्ञान पंढरी
दिनकर गागरे यांना जेएनयु जयपुर विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त
पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील पळशी सारख्या ग्रामीण भागात जन्माला आलेल्या एका तरुणाने जिद्द, चिकाटी व मेहनतीने जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटी, जयपुर, राजस्थान मध्ये रसायन शास्त्र या विभागात आपले नाव कोरले आहे. या तरुणाची ही कामगिरी प्रेरणादायी आहे. डॉ. दिनकर बाळासाहेब गागरे असे या पीएचडी धारकाचे नाव आहे. नुकत्यात झालेल्या पदवी समारंभात डॉ. दिनकर यांना राजस्थान राज्याचे राज्यपाल श्री कलराज मिश्रा, आमदार मोहन लाल गुप्ता तसेच जेएनयु विद्यापीठाचे चेअरमन डॉ. संदीप बक्षी, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. प्रीती बक्षी मॅडम, प्रेसिडेंट आर एन रैना, कुलगुरू एच एन वर्मा व डॉ. रामा लोखंडे हेड ऑफ द केमिस्ट्री डिपारमेंट यांच्या हस्ते प्राप्त झाली.
डॉ. दिनकर गागरे यांनी बीएससी व एमएससी रसायनशास्त्र विषयात पदवी अहमदनगर प्रसारक महामंडळाचे पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथून प्राप्त केली आहे. तसेच आता याच विषयात शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पीएचडी ही पदवी मिळवून आपला ठसा उमटवला आहे.
डॉ. दिनकर गागरे यांना डॉ. रामा लोखंडे, डॉ. पुनम द्विवेदी मॅडम व डॉ. राजू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच डॉ. अजय देशमुख, डॉ. आहेर, डॉ. ठुबे, डॉ. थोपटे, प्रवीण डौले व रसायन शास्त्र विषय न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज पारनेर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी डॉ. दिनकर बोलताना म्हणाले की त्यांचे आई-वडील, भाऊ पत्नी व गागरे परिवार यांच्या पाठिंब्यामुळेच ही शिक्षण क्षेत्रातली सर्वोच्च पदवी प्राप्त करणे शक्य झाले. सध्या ते युएसव्ही फार्मासिटिकल, कॉर्पोरेट ऑफिस मुंबई नामांकित कंपनीमध्ये रेग्युलेटरी अफेअर्स या डिपारमेंट मध्ये कार्यरत आहे.
या यशाबद्दल अखिल भारतीय क्रांती सेनेचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील, पळशी गावचे सरपंच आप्पासाहेब शिंदे, ज्योती दिनकर गागरे व गागरे परिवार, तसेच पळशी ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले.