महाराष्ट्र

माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांच्याकडुन क्रांतीनामा वेबपोर्टलला आशिर्वाद रुपी शुभेच्छा

व्हिडीओ : माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांच्याकडुन क्रांतीनामा वेबपोर्टलला आशिर्वाद रुपी शुभेच्छा

मुंबई : क्रांतीसेनेच्या संस्थापक अध्यक्षा तथा माजी महसूल मंत्री डॉ शालिनीताई पाटील यांनी व्हिडिओ लाईव्हच्या माध्यमातून अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या क्रांतीनामा न्युज वेबपोर्टलच्या कार्याचे भरभरून कौतुक करत आशिर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. शालिनीताई पाटील यांनी एका व्हिडिओ लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत क्रांतीनामा नावाने नव्याने सुरू केलेल्या वेबपार्टलच्या माध्यमातून नवीन विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही करत आहात, हि बाब अतिशय कौतुकास्पद असून या चांगल्या कामासाठी तुमच्या सर्व टिमला बळ मिळावं अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

त्याचबरोबर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, चांगले विचार समाजाला देण्याची गरज आहे. तरुण पिढी व्यसनमुक्त व्हावी व त्यांना नवी दिशा मिळावी. तसेच या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या हातून देश हिताचं कार्य घडावं, अशी सदिच्छा व्यक्त करत त्यांनी पुढील यशस्वी वाटचालीसाठी आशिर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या आहेत.


Related Articles

Back to top button