महाराष्ट्र

इपीएस ९५ पेन्शनर्स प्रश्न दोन महिन्यात मार्गी लावणार-ना.डॉ भागवत कराड

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : इपीएस ९५ पेन्शन धारकांचा प्रश्न येत्या दोन महिन्यात संबंधित मंत्री डॉ राजेंद्रसिंह, भूपेंद्र यादव व पदाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून बैठक घडवून आणून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवतराव कराड यांनी औरंगाबाद अग्रसेन भवन येथे झालेल्या राज्यस्तरीय पेन्शनर्स बचाव भव्य मेळाव्यात केले. 


ते पुढे म्हणाले की मी अडचणीची, गरिबीची जाण असलेला कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रीय संघर्ष समिती अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांच्या बरोबर चर्चा पण केली आहे. मी तुमच्याबरोबर सतत राहीन व मदत करीन, आपले पेन्शनरांचे ६ लाख कोटी जमा आहेत. त्यावर व्याज जमा होते. ते आपल्याला मिळत नाही. सर्वोच्च न्यायालय ने पेंशनरांच्या बाजूने निर्णय दिला. हा विषय मी पूर्ण समजून घेतला आहे. तुमच्या भावनांशी मी सहमत आहे. आपला स्वाभिमान, संकृती, अस्मिता जपण्यासाठी एकत्र येऊन प्रश्न सुटेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन असे, ना.कराड म्हणाले.

या भव्य मेळाव्यास महाराष्ट्रातील पाच ते सहा हजार पेन्शनर्स उपस्थित होते. प्रमुख अतिथी ना.भागवतराव कराड हे होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत होते. अध्यक्ष अशोकराव राउत यांनी पेंशनर्सच्या व्यथा मांडल्या. या अल्प पेन्शनमुळे जीवन जगणे अवघड आहे. ३५ वर्षे जेष्ठांनी देशाची सेवा करून ते हालाखीचे लाचारीचे जीवन जगत आहे. भारतीय संस्कृतीला न शोभणारे कृत्य देशभर घडत आहे. म्हणून मान सन्मानाने जगता यावे म्हणून हक्काची कमीतकमी रु ७५००/-दरमहा पेन्शन अधिक महागाई भत्ता मिळावा, वैद्यकीय मोफत सुविधा द्यावी अशा मागण्या आहेत. इतरांना किती पेन्शन दिल्या जाते याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. दरवर्षी अनेक मृत्युमुखी पडत आहेत.


पंतप्रधान यांनीही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र अध्यक्ष आंबेकर, पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती आरास, डॉ पी एन पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी संघटक सरिता नारखेडे, प.भारत संघटक सी एम देशपांडे, पश्चिम बंगाल तपन दत्ता, महिला रा.आघाडी उपाध्यक्षा जयश्री किवळेकर, कविता भालेराव, महाराष्ट्र कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, जिल्हाध्यक्ष वाडगावकर, शहर अध्यक्ष सुरेश पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंग जाधव आदींची भाषणे झाली.

रा.संघर्ष समिती महासचिव विरेंद्रसिंग राजावत यांच्या जोशपूर्ण भाषणात व्यथा मांडल्या. यावेळी“जेष्ठ भारत श्रेष्ठ भारत, हम सब एक है, आदी घोषणा दिल्या. मेळावा यशस्वी होण्यासाठी कमलाकर पांगारकर, जिल्हा अध्यक्ष वाडगावकर, सुरेश पाटील, निकम, आदींच्या औरंगाबाद टीमने विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button