राजकीय
लोणी खुर्द येथे नादुर शिंगोटे- अ.नगर महामार्गावर खा. शरद पवारांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
लोणी प्रतिनिधी : राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील वेताळ बाबा चौकात कार्यकर्त्याकडुन डाॅ. खा शरदचंद्रजी पवार यांचे फटाक्याच्या आतषबाजीत उस्फूर्त स्वागत केले. यावेळी शरदचंद्र पवार यांनी गावात थांबुन कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान प्रवरा उद्योग समूहाचे संस्थापक व शिर्डी मतदारसंघातील पहिले आमदार स्वर्गीय चंद्रभान दादा घोगरे पाटील यांची आठवण काढुन त्याच्या जुन्या आठवणींना खा पवार यांनी उजाळा दिला. यावेळी सरपंच घोगरे यांच्या विनंतीवरून खा पवार यांनी गाडीच्या खाली उतरुन कार्यकर्त्याशी संवाद साधला व या वेळी सरपंच जनार्दन घोगरे यांना “कामाला लागा” हा अनमोल संदेश देवुन खा पवार काकडी विमानतळाकडे मार्गस्थ झाले.
लोणी खुर्द चे सरपंच जनार्दन घोगरे व कृषीभुषण प्रभाताई घोगरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान केलाा. या दौर्यात राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे, साई संस्थान अध्यक्ष आ आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, विश्वस्त महेंद्र शेळके, यांच्यासह जिल्हातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील होते.
यावेळी कोल्हार बुद्रूक चे मा. सरपंच सुरेंद्र खर्डे, अ.नगर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्रीकांत मापारी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, आबासाहेब आहेर, आप्पासाहेब घोगरे, आनिल आहेर, रणजित आहेर, दिपक घोगरे, कैलास आहेर, सचिन आहेर, बाळासाहेब आहेर, सुहास आहेर, जालिंदर मापारी, विराज शिंदे, पवन दिघे, सागर कडु, नासिर मनियार, मयुर आहेर, गौतम आहेर, संजय आहेर, राहुल विखे, आण्णा राक्षे, यांच्यासह लोणी सह प्रवरा परिसरातुन शरदचंद्र पवार यांचा मोठ्या संख्येने चाहता वर्ग या वेळी उपस्थित होता.
प्रवरा परिसराच्या प्रत्येक घटकांची जाण असलेला देशाचा नेता जाणता राजा शरदचंद्रजी पवार आहेत. त्यांच्यावर शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार स्वर्गीय चंद्रभान दादा यांचे निस्सीम प्रेम होते. खा पवार ज्या वेळेस पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी स्वर्गीय चंद्रभान दादा विधानसभेत सदस्य होते._श्री.जनार्दन घोगरेसरपंच ग्रा.पं लोणी खुर्द