सामाजिक

पुणे जिल्हा तृतीयपंथी समाजाच्या विकास कमिटीवर भूमि फाउंडेशनचे पवार यांची निवड

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : पुणे जिल्हा तृतीय पंथी समाजाच्या विकास कमिटीवर भूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रा कैलास पवार यांची पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे. तृतीयपंथी समाजाला न्याय देण्यात पुणे जिल्हा आज प्रथम क्रमांकावर आहे.
कोरोनाच्या काळात तृतीयपंथी समाजाला भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. त्याचबरोबर तृतीयपंथीयांचा सर्वे करून त्यांच्या अडचणी, समस्या याबाबत एक अहवाल तयार करून कैलास पवार यांनी पुणे जिल्हा अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सादर करत एकूण सहा प्रमुख मागण्या केल्या होत्या. सदर मागण्या जिल्हाधिकारी महोदयांनी सकारात्मक विचारात घेऊन त्यावर मार्ग काढला आणि आज पुणे जिल्हा महाराष्ट्रात तृतीयपंथी समाजाला न्याय देण्यात प्रथम क्रमांकावर ठरला.

प्रा कैलास पवार हे संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात अनेक उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या निवडीबद्दल उद्योजक किशोर निर्मळ, माजी प्राचार्य टी ई शेळके, डॉ बाबुराव उपाध्ये, पत्रकार प्रकाश कुलथे, अशोक त्रिभुवन, भीमराज बागुल, बी आर चेडे, प्राचार्य पांडुरंग पवार आदिनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button