छत्रपती संभाजीनगर

पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथे दिव्यांग निधीचे वाटप

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील ७४ जळगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले. सन २०१४ पासुन आपंगाच्या कल्याण व पुनर्वसनासाठी शासनाच्या ध्येय धोरणानुसार ग्रामपंचायत स्तरावर ५ टक्के निधी राखिव ठेवण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने ७४ जळगाव येथे आज (दि.२६) रोजी १२ दिव्यांगांना प्रत्येकी एक हजार दिव्यांग निधिचे वाटप सरपंच गौतम सोनवणे, ग्रामसेवक भगवान काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपसरपंच नितीन एरंडे, शिक्षक सेना तालुकाध्यक्ष अमोल एरंडे,ज्ञदिलिप एरंडे, बाळू मुळे, विक्रम एरंडे, रामभाऊ मतकर, संदिप लाटे, ग्रामपंचायत कर्मचारी बिहारीलाल पाठे, भाऊसाहेब जगधने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दादासाहेब गटकळ, द्वारकादास ईथापे, रेनुका लाटे, भाऊसाहेब लाटे, आन्नासाहेब खरात, वंदना लाटे, काकासाहेब एरंडे, साईनाथ मतकर यांच्यासह अन्य लाभार्थीनी हजर राहुन लाभ घेतला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button