सामाजिक
मातोश्री कलावती म्हसे पाटील सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने उद्या सावेडीत भव्य रक्तदान शिबीर
राहुरी प्रतिनिधी : मातोश्री कलावती म्हसे पाटील सामाजिक प्रतिष्ठाण व Jample Life Pvt.ltd यांच्या संयुक्त विद्यमाने जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर मातोश्री कलावती पाटीलबा म्हसे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमीत्त भव्य रक्तदान शिबीर शनिवार दि. २३ ऑक्टोबर २०२१ रोजी स. १० ते २ या वेळेत IFS Officer अर्जुन म्हसे यांचा बंगला प्लॉट नं. २३ राज्य कर्मचारी वसाहत, समता नगर सावेडी, अहमदनगर येथे आयोजित केले आहे.
जलसंधारण मंत्री ना. शंकरराव यशवंतराव गडाख, ना. प्राजक्त तनपुरे, आ. संग्रामभैय्या जगताप, आ. निलेश लंके, आ. मोनिकाताई राजीव राजळे आदी मान्यवरांच्या हस्ते व मातोश्री कलावती पाटीलबा म्हसे, आय.एफ.एस. अर्जुन पाटीलबा म्हसे, सौ. मोहिनी अर्जुन म्हसे, साहेबराव पाटीलबा म्हसे, सौ. कल्याणी साहेबराव म्हसे,आय.ए.एस. योगेश पाटीलबा म्हसे, आय.ए.एस. सौ. स्वाती योगेश म्हसे, सौ. शोभा भाऊसाहेब खर्डे, सौ. छाया रविंद्र खर्डे, सौ. सुनिता बाळासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या भव्य रक्तदान शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अंबादास कडू सरोदे, सौ. ज्योती अंबादास सरोदे, सौ. कांचन हरिश्चंद्र राऊत, सौ. योगिता सार्थक दायमा आदींनी केले आहे.