अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार
विजय चिडे/पाचोड : भरधाव वेगाने दुचाकीवरुन गावाकडं जाणाऱ्या एका बत्तीस वर्षीय व्यक्तीला पैठण-पाचोड राज्य महामार्गावरील लिमगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.२०) रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली आहे. प्रमोद कारभारी होंडे (वय३२) रा.अंबड असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याविषयी अधिक माहीती अशी की, पुण्यावरुन आपल्या गावाकडं जाण्यासाठी प्रमोद होंडे हा दुचाकी क्रमांक (एमएच २१ बी.ई.५५६६ ) वरुन येत असताना पाचोड-पैठण राज्य महामार्गवरील लिमगाव फाट्याजवळ बुधवार रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा अक्षरशः चुरा झाला आहे. हा अपघात झाल्याचे रस्त्यावरील नागरिकांच्या लक्षात येताच या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पाचोड पोलीसांना दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रमोद होंडे यास तात्काळ खाजगी वाहनाने पाचोड येथिल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिपान काळे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.या घटनेचा पोलिस कर्मचारी पणन चव्हाण यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. गुरूवारी सकाळी दहाच्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी उत्तरणीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांना सुपुर्द केला. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखावी बीट जमादार प्रशांत नांदवे सह पो.काॅ. पवन चव्हाण करीत आहे.