अहिल्यानगर
टीडीएफच्या अध्यक्षपदी औताडे यांची निवड
श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : श्रीरामपूर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या नवीन कार्यकारिणीची निवडीची सभा गुरुवारी माध्यमिक शिक्षक सोसायटी श्रीरामपूर येथे जिल्हा निरीक्षक सुरेश झावरे यांच्या उपस्थितीत जेष्ठ नेते भागचंद औताडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
टीडीएफची नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रवींद्र औताडे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत भांड, सौ जयश्री उंडे, बाळासाहेब बनकर यांची निवड झाली तर सचिव-अशोक कटारे खैरी, सहसचिव-गुलाब रूपटक्के, साबीर शहा, धनंजय उटावळे, खजिनदार-दत्तात्रय मैड, जिल्हा प्रतिनिधी-भागचंद औताडे, मच्छिंद्र जगताप, रंगनाथ माने, सुर्यकांत डावखर, अर्जुनराव डुक्रे, लेविन भोसले, सुधीर भागडे, जाकीर सय्यद, जयकर मगर, संजय कोळसे, गोपीनाथ वमने, जनार्दन ठुबे, कैलास उंडे, विजय नान्नर, बाबासाहेब थोरात, अरबाज पठाण, दगडू बत्तीसे, बबनराव लबडे यांची निवड सर्वानुमते झाली.
या निवडीप्रसंगी राजीव कर्जुले, सुभाष पवार, चंद्रकांत भांड, विनोद जुंदरे, विशाल कोळसे, प्रकाश राजुळे, लहानू लबडे, अजीज शेख आदी सर्व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.