अहिल्यानगर
आधुनिक संशोधनातून तयार केलेल्या नवीन खतांचा शेतकऱ्यांना पुरवठा करावा-डॉ ढगे
राहुरी शहर/वृत्तसेवा/अशोक मंडलिक : आधुनिक संशोधनातून कृषी क्षेत्रात जपानमध्ये ई एम व जर्मनीमध्ये बायोडायनॅमिक तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठात द्रवरूप जिवाणू खते सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त लिक्विड रासायनिक खते यांचे उत्पादन होते. या नवीन खतांचा शेतकऱ्यांना पुरवठा करावा. कारण ही खते स्वस्त हाताळण्यास सोपी व शेतमालाचे भरघोस उत्पादन वाढवणारी आहेत, असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले.
भेंडा बुद्रुक येथे स्वरा कृषी सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.ढगे यांनी उसासाठी सिलिकॉन व इतर नवीन खतां संदर्भात मार्गदर्शन केले. ह भ प सुनील गिरी महाराज यांच्या शुभहस्ते स्वरा या खताच्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन समारंभाला ह.भ.प. अंकुश महाराज कादे, ह.भ.प. गणेशानंदजी महाराज, जलमित्र सुखदेवराव फुलारी, इफ्काचे रवींद्र मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन डॉक्टर शिवाजी शिंदे, अशोक मिसाळ, रामकृष्ण नवले, विविध कार्यकारीचे चेअरमन भागचंद सावरे, तुकाराम मिसाळ, बाबुराव चावरे, ईश्वर पाठक, प्रा गोरक्षनाथ पाठक, प्रा समीर ढगे, भीमराज पाठक उपस्थित होते.
ह भ प अंकुश महाराज कादे व ह भ प सुनील गिरी महाराज यांनी आशीर्वाद पर विचार मांडून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन ह. भ. प. भागचंद महाराज पाठक यांनी केले व आभार प्रदर्शन संदीप पाठक यांनी मानले.