राजकीय

चिंचोली वि.का.सह संस्थेच्या अध्यक्षपदी विलास काळेंची बिनविरोध निवड

चिंचोली/बाळकृष्ण भोसले : तालुक्यातील चिंचोली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी युवक कार्यकर्ते विलास बबन काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


या संस्थेची निवडणूक माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याच दोन गटात होते. ज्येष्ठ नेते जालिंदर काळे यांच्या गटाने स्पष्ट बहुमत मिळविले होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पद एक वर्षासाठी ठेवत निवडून आलेल्या प्रत्येक संचालकांना समान संधी देण्यात येत आहे. त्यानुषंगाने तत्कालीन अध्यक्ष आण्णासाहेब काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान राहुरी येथील सहाय्यक निबंधक यांनी नूतन अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.डी. खंडेराय यांची नियुक्ती केली होती.

मंगळवार १९ आक्टोबर रोजी बोलाविलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बाबासाहेब विश्वनाथ गागरे यांनी अध्यक्षपदासाठी विलास काळे यांच्या नावाची सूचना मांडली त्याला ज्येष्ठ संचालक चंद्रभान सगाजी काळे यांनी अनुमोदन दिले. या बैठकीत श्री काळे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे श्री खंडेराय यांनी जाहीर केले. त्यांना सहाय्यक म्हणून सचिव प्रदिप काळे यांनी काम पाहिले.

दरम्यान संस्थेला सन २०२०-२१ या अहवाल सालात २३ लाख ४४ हजाराचा नफा झाला असून संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. सभासदांना दिपावलीनिमित्त ८ टक्के लाभांश दिला जाणार असून तब्बल ५ लाख ६८ हजार रक्कम लाभांशरुपाने देण्यात येणार आहे. सदर लाभांशाचे वितरण सुरू करण्यात आले असल्याचे नवनिर्वचित अध्यक्ष विलास काळे यांनी सांगितले.

प्रसंगी जालिंदर काळे, पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक अशोक गागरे, विजय सिनारे, बाळासाहेब काळे, विनोद काळे, दत्तात्रय काळे, चंद्रभान काळे, दिलिप दाढकर, दत्तात्रय नलगे, आण्णासाहेब काळे, भास्कर लाटे, दत्तात्रय हारदे, बाळासाहेब गागरे, सोपान काळे, वसंत कातोरे, जगन्नाथ भोसले, तात्यासाहेब कातोरे, प्रकाश लाटे, सुनील काळे, प्रमोद काळे आदिंसह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

Related Articles

Back to top button