अहिल्यानगर
ग्रामपंचायत सदस्य साळुंके यांचा शिवसेनेत प्रवेश
श्रीगोंदा प्रतिनिधी/सुभाष दरेकर : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवासेना संपर्कप्रमुख संजय साटम, युवासेना जिल्हा प्रमूख रविभाऊ वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमूख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यात अनेक सुशिक्षित उच्यशिक्षित तरुण शिवसेना या पक्षात प्रवेश करित आहे.
चोरचीवाडी भिगान येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निलेश बाळासाहेब साळुंके यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना जेष्ठ नेते सुरेश देशमुख, युवासेना तालुका प्रमुख निलेश गोरे, युवासेना शहरप्रमूख ओंकार शिंदे, युवासेना उपशहर प्रमूख जयराज गोरे व शिवसैनिक शुभम गोरे, विशाल गोरे उपस्थित होते.