सामाजिक
सामाजिक जाणीवेतून सात्रळ महाविद्यालयाने आयोजित केली कोविड १९ लसीकरण मोहीम
चिंचोली /बाळकृष्ण भोसले : समाजासाठी आपणही काही देण लागतो या भावनेतून व सध्या कोविड लसीकरणाची जनमाणसातील अनास्था पाहता तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, सात्रळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड -19 लसीकरण मोहीम महाविद्यालयातील जिमखाना हॉलमध्ये आयोजीत करण्यात आली. याप्रसंगी सात्रळ महाविद्यालयातील ३० विद्यार्थी-विद्यार्थिनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले.
कोविड – १९ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ. सोमनाथ घोलप यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रा. आ. केंद्राच्या डॉ. तांबोळी व त्यांचे सर्व सहकारी तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहिदास भडकवाड, प्रा. निलेश कान्हे, डॉ. अमित वाघमारे, डॉ. रामदास बोरसे, डॉ. गोरक्षनाथ बोर्डे, डॉ. गंगाराम वडीतके, प्रा. एकनाथ निर्मळ, प्रा. नंदकिशोर भंडारी, प्रा. छाया कारले, प्रा. आदिनाथ दरंदले, प्रा. हरिदास हजारे, प्रा. सुरेश अनाप, सहकारी प्राध्यापक व प्रशासकीय सेवक वृंद उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या या निस्वार्थी व जनसामान्यांच्या आरोग्याप्रती अत्यंत महत्वाच्या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.