महाराष्ट्र
सरपंच सेवा संघाकडुन कोरोना मुक्त आदर्श ग्राम योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार
संगमनेर/बाळासाहेब भोर : सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या शासन प्रथम नोंदणीकृत सरपंच संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व सरपंच यांना मार्गदर्शन करण्यासाठी, ग्रामविकासा संदर्भात विविध विकास कामांची माहिती सरपंच यांच्या पर्यत पोहचवण्याच काम, सरपंच यांच्या शासन स्तरावर अडी अडचणी सोडवण्याचे काम केले जाते .
सरपंच सेवा संघ ही संघटना अहमदनगर जिल्हातील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्य शासनाला वेळोवेळी पत्र व्यवहार करून सरपंच संघटनेच्या माध्यमातून सरपंच मानधन वाढीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला व सरपंच, उपसरपंच यांचे मानधन वाढवण्यात आले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विविध सरपंच प्रशिक्षण मेळावे घेण्यात आले. सरपंच सेवा संघा कडुन राज्यातील तीन वर्षांपासून अनेक सरपंच यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गेली दोन वर्षां पासुन आपल्या देश, राज्य, जिल्हा, गाव व आपल्या कुटुंबावर या कोरोना महामारी मुळे फार मोठे संकट उभे राहीले आहे. या कोरोना मुळे आपले फार मोठे नुकसान झाले. कोणाचे आपल्या घरातील कर्ते माणसं गेली. हे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. परंतु लाॅकडाऊन च्या काळात आपल्या गावासाठी सरपंच आपल्या कुटुंबाची पर्वा न करता गाव हेच आपले कुटुंब आहे म्हणून अतिशय तळमळीने गावामध्ये चांगले नियोजन करून आपल्या गावात कोरोना मुक्त कस राहिल याची काळजी घेण्याच काम कोणी केल असेल तर ते काम सरपंच,उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ, आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका ,शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मार्फत सरपंच यांनी करून घेतले. गावातील ग्रामस्थ यांचे प्रबोधन करून त्यांना करोना सलीकरण असेल. आपल्या गावात कशा जास्तीत जास्त कशा लस उपलब्ध होतील याचा पाठपुरावा करून घेतला व गावात पुर्ण सलिकरण करून घेतले व आपले गाव करोना मुक्त कसे राहिल याची पुर्ण काळजी घेण्याचे काम सरपंच यांनी केले.
सरपंच सेवा संघा कडुन सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना कोरोना मुक्त आदर्श ग्राम योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शिर्डी मध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात येणार आहे.ज्या सरपंचांना या कोरोना मुक्त आदर्श ग्राम योध्दा पुरस्कारासाठी नाव नोंदणी करायची असेल तर आपण ९०११९६०००२, ९५१८३९७६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा. पुरस्काराचे नामांकन फार्म पाठवत असताना आपण व्हटसअप वर कोरोना काळात गावात केलेले कामे याची माहिती, फोटो व किती लसिकरण पुर्ण झाले याची सविस्तर माहिती व्हटसअप पाठवावी, असे आवाहन सरपंच सेवा संघाचे राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील यांनी केले आहे.