शिक्षणवारी ज्ञान पंढरी
जीवनातील ध्येय निश्चित करा तरच यश मिळेल-डॉ. खंडू पांढरे
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी (भंडारदरा डॅम) ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी डॉ. खंडू सोमा पांढरे यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून पशुधन विकास अधिकारी श्रेणी-1 पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.
रतनवाडी सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागातून पांढरे यांनी यश संपादन केले. त्यांचा गुणगौरव सोहळा शेंडी ज्युनिअर कॉलेज येथे पार पाडला. १० वी, १२ वी नंतर काय करायचे हा प्रश्न अनेकांना असतो जीवनातील ध्येय निश्चित केले तरच यश मिळेल. तसेच पांढरे यांचा जीवनपट स्पर्धा परीक्षाचा अभ्यास यासंदर्भात मार्गदर्शन डॉ खंडू पांढरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रोंगटे डी.एन. तर प्रमुख पाहुणे मुंबई महानगरपालिका येथील सिनिअर कॉलनी ऑफिसर हिरामण झडे, सोमा पांढरे हे होते.
जुनियर कॉलेज विभागात वाचन प्रेरणा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये मुलांना वाचनाची प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ. खंडू पांढरे यांनी विद्यार्थ्यांना वाचना विषयी मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांना पेढ्याचे वाटप केले. मुंबई महानगरपालिकेचे सिनिअर कॉलनी ऑफिसर हिरामण झडे यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नका संघर्ष केला तरच यश मिळेल असे प्रतिपादन केले व विद्यालयाला पंचवीस हजार देणगी देऊन भरीव मदत केली. तसेच अध्यक्ष भाषणात प्राचार्य रोंगटे डी. एन. यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता, नम्रता, आदर असेल तोच यशस्वी होतो. वाचन प्रेरणा दिनापासून सर्वांनी पुस्तक वाचन करण्यास सुरुवात करावी, विद्यार्थी शिस्तप्रिय असेल तरच सकारात्मक बदल होईल असे आपल्या भाषणात सांगितले. पाहुण्यांचा परिचय रवींद्र गायकवाड यांनी सांगितला. अध्यक्ष सूचना नरेश खाडगीर तर अनुमोदन दीपक बाळसराफ यांनी मांडले तसेच कार्यक्रमाचे सुरुवात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाडेकर तर आभार प्रदर्शन विकास आवारी यांनी केले.
याप्रसंगी गोपाळ दराडे शिवाजी बुरके, दत्तात्रय महाले, एकनाथ मुकणे, आनंद चौधरी, राजेंद्र चव्हाण, प्रभाकर गावंडे, सीमा सावंत, अनुसया वाळेकर, गणेश वैद्य, मेंगाळ, भोईर आदि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.