राजकीय

जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिका निवडणुका एम.आय.एम स्वबळावर लढविणार

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : राहुरी खुर्द येथे एम.आय.एम पक्षाच्या झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदील मगदूमी यांनी केली.


पक्षाचे खासदार इम्तियाज जलील व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिल मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा व अकोले तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका या स्वबळावर लढवल्या जातील अशी घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली. बैठकीमध्ये येणाऱ्या काळात पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागा अशा सूचना उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष आदील मगदूमी यांनी केली.

याप्रसंगी माजी उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष इम्रानभाई देशमुख, आरीफ बागवान, संजय संसारे, हापिज मुजाहिद, इम्रान ईराणी, इम्रान सय्यद, इमदाद पठाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button