सामाजिक
मोफत आरोग्य तपासणी हा स्तुत्य उपक्रम : मा. खा. तनपुरे
राहुरी प्रतिनिधी : सध्याच्या कोरोना काळात मोफत आरोग्य तपासणी हा एक चांगला व स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांनी व्यक्त केले.
राहुरी येथे समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या सौजन्याने या कंपनीचे सीएमडी सतीशराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ किसनराव इंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मोफत हाडांच्या विविध आजारांच्या तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी तनपुरे बोलत होते. या शिबिरामध्ये प्रसिद्ध हाडवैद्य राजेंद्र भगत यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. त्याच बरोबर पुणे येथील त्वचारोग तज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत गरड, श्रीरामपूर येथील डॉक्टर अन्सार शेख यांनीही रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बबनराव इंगळे, अनिलराव इंगळे, सागर खडके, डॉ. जालिंदर देशमुख, सुनिल खिलारी, महेश उंडे, सतीश दळे, विशाल घाडगे आदी उपस्थित होते.