राजकीय

शिर्डी नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढविण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

लोणी प्रतिनिधी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले, राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे जिल्हा समनव्यक ज्ञानदेव वाफारे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त तथा जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, विधानसभा नेते सुरेशराव थोरात, अ.नगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी, शहराध्यक्ष सचिन चौगुले, सुभाषराव सांगळे यांच्या उपस्थितीत आगामी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, अनुसूचित जमाती विभाग, मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्यांक विभाग, उद्योग व व्यापार विभाग, सोशल मीडिया विभाग या सर्व विभागांचा स्वतंत्र आढावा घेत संघटन बांधणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीला धनाढ्य शक्ती विरुद्ध कशाप्रकारे सामोरे जायचं याबाबतही सखोल चर्चा करण्यात आली.


या बैठकीत वाढती महागाई, शिर्डी शहरातील वाढलेली बेरोजगारी, शिर्डी शहरातील सत्ताधारी व प्रस्थापित नेत्यांनी लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य शिर्डीकर यांच्याकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष यामुळे शिर्डी शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. याचाच आधार घेत सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व फ्रंटलच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिर्डी नगरपंचायतची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याची मागणी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक स्वबळावरच लढविली जाईल सर्वांनी तयारीला लागा, अशी सूचना केली.

यावेळी ता.उपाध्यक्ष सुभाष निर्मळ, कॉंग्रेस सेवादलाचे ता.अध्यक्ष रमेश गागरे, आशोक कोते, एनएसयूआयचे ता.अध्यक्ष स्वराज त्रिभुवन, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमृत गायके, शेखर सोसे, काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष समीर शेख, शहर उपाध्यक्ष सुरेश आरणे, मोसिन सय्यद, सरचिटणीस अविनाश शेजवळ, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष पापाभाई पठाण, एनएसयूआयचे शहराध्यक्ष सौरभ हाडवळे, अनुसूचित जमातीचे शहराध्यक्ष विजय पवार, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष विशाल अहिरे, युवक कार्याध्यक्ष अमोल कोते, योहान गायकवाड, युवक सचिव कृष्णा गायकवाड, युवक उपाध्यक्ष संतोष वाघमारे, समन्वयक योगेश निरभावणे, चंद्रभान पवार, आसिफ सय्यद, यु.ता.कार्याध्यक्ष आसिफभाई इनामदार, राजू दिघे, अजीज बागवान, संदीप शेजवळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button