छत्रपती संभाजीनगर

ढाकेफळ येथे रक्तदान शिबीर संपन्न

 

◾माजी जि.प.सभापती विलास बापु भुमरे यांच्या हस्ते उद्घाटन

विलास लाटे /पैठण :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा लक्षात घेता पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे विलासबापू भुमरे प्रतिष्ठाण व अखिल भारतीय छावा संघटना तसेच औरंगाबाद ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,१० रोजी ढाकेफळ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरासाठी छावा संघटना व पंचक्रोशीतील नवतरुण युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास बापु भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छावा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष किशोर शिरवत, जि.प.सदस्य साईनाथ सोलाट, सतिष शेळके, नितीन एरंडे, शेखर माञे, जन संपर्क अधिकारी विजय सोनुणे, योगेश शिसोदे, गणेश बोंबले, ईम्राण पठाण, नारायण सोणवने, ज्ञानदेव शिरवत, आमोन आव्हाड, महेंद्र वजांरे, सुधिर आव्हाड, संजय शिंदे, कदिर शेख, कैलास शिंदे, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक किरण काळे पाटील, कृष्णा उघडे, सरपंच गौतम सोनवने, शिवाजी कणसे यांच्यासह मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button