छत्रपती संभाजीनगर

इंटरनेट ऑफ थिंग्ज मध्ये करिअरच्या संधी – दादासाहेब एखंडे

 
विजय चिडे/पाचोड : शिवछत्रपती कला महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या ऑनलाईन कार्यशाळेला शिवछत्रपती कॉम्प्युटर्सचे संचालक दादासाहेब लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी असे म्हटले की, विद्यार्थ्यांना इंटरनेट ऑफ थिंग्ज मध्ये करिअर करता येईल. आज दैनंदीन इंटरनेट वापर वाढत आहे. इंटरनेट मुळे वेळेची बचत तर होतेच आणि अनेक माहिती आपल्याला एका क्लिक द्वारे मिळते. त्यामुळे या क्षेत्रात अनेक रोजगारच्या संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांच्या  निदर्शनास आणुन दिले. 

या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉ.सुरेश नलावडे यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. शिवाजी यादव यांनी केला. यात त्यांनी असे म्हटले की, विद्यार्थी हा भविष्यातील देशाचा आधारस्तंभ आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉम्प्युटरचे महत्व अनन्यसाधारण झाले आहे. कॉम्प्युटरच्या क्षेत्राचा विस्तार दिवसेंदिवस होत असल्याने कॉम्प्युटरच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हरिप्रसाद बिडवे यांनी केले तर आभार डॉ. सुभाष पोटभरे यांनी मानले या कार्यक्रमाचे संयोजक प्रा.संदीप सातोनकर यांनी व सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. गांधी बानायत विशेष परिश्रम घेतले.

यावेळी डॉ.संतोष चव्हाण, डॉ. उत्तम जाधव, डॉ.भगवान जायभाये, डॉ. विलास महाजन, प्रा. हेमंत जैन, प्रा. तुकाराम गावंडे, प्रा. सचिन कदम, प्रा. विनोद कांबळे, डॉ. विठ्ठल देखणे. श्री.अनिल नरवडे, सतीश वाघ, गजानन इंगळे, मुरलीधर झीने, उमाकांत भोसले, गजानन गवारे सह विद्यार्थी व विद्यार्थिनींनी झूम ॲपवर ऑनलाइन कार्यशाळेसाठी सहभागी होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button