आरोग्य

आयुर्वेदिक कुकिजचा वापर आहारात करावा- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठमहात्मा फुले कृषि विद्यापीठातील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत चालविल्या जाणार्या बेकरी युनिटमध्ये दर्जेदार उत्पादने तयार होत आहेत. या बेकरी युनिटमध्ये तयार होणार्या औषधाच्या स्वरुपात अन्न या प्रकारात फुले शतावरी, फुले अश्वगंधा, फुले आवळा, फुले पुदिना व फुले बेहडा या कुकिजचे उत्पादन केले जाते.

आपल्या आरोग्याच्या दुष्टीने महत्वाच्या असणार्या या कुकिजचा तसेच या युनिटमध्ये तयार होणार्या इतर पदार्थांचा उपयोग विद्यापीठातील व इतर सर्व लोकांनी खाद्यअन्न म्हणुन करावा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बेकरी युनिटला कुलगुरु डॉ. पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या बेकरी युनिटमध्ये अद्ययावत उपकरणांच्या मदतीने स्वच्छ व सुरक्षीत वातावरणात शास्त्रीय पध्दतीने ब्रेड, बनपाव, नानकटाई, सुरती बटर, मिल्क टोस्ट, नाचणी बिस्कीट व आयुर्वेदिक कुकिज इ. उत्पादने तयार केली जातात. तसेच या युनिटमार्फत फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञान तसेच बेकरी तंत्रज्ञान असे एक महिना कालावधीचे दोन ट्रेनिंग सुशिक्षीत बेरोजगारांना दिले जाते व त्यामार्फत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.


आतापर्यंत जवळजवळ 661 लोकांनी फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञान यावरील प्रशिक्षण घेवून त्यातील 30 व्यक्तींनी स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला आहे. बेकरी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण 235 युवकांनी पुर्ण करुन 15 युवकांनी स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरु करुन इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिलेली आहे अशी माहिती अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण यांनी यावेळी दिली.

अतिशय कमी मनुष्यबळामध्ये या विभागाने अतिशय चांगले काम शेतकर्यांसाठी, बेरोजगार युवकांसाठी, महिला बचट गटासाठी तसेच काही शासकीय अधिकार्यांसाठी केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे मा. कुलगुरुंनी कौतुक केले व इतर विभागांनीही असेच उल्लेखनीय काम करावे अशी आशा कुलगुरु डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button