सामाजिक
आमदार निलेश लंके यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने अशोकराव तुपे सन्मानित
आ. निलेश लंके यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार स्वीकारताना अशोकराव तुपे…
वांबोरी प्रतिनिधी : येथील सामाजिक कार्यकर्ते अशोकराव तुपे यांना नुकताच स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, निमगांव वाघा ता.जि. अहमदनगर यांच्यातर्फे नुकताच राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अशोकराव तुपे हे अनेक वर्षापासून समाजकार्यात कार्यरत आहेत. विविध प्रश्नांवर आवाज उठवणे, दंत तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिरे राबविणे, शालेय विद्यार्थी, गरजवंत, अपंग, अनाथांना विविध सामाजिक माध्यमातून मदत व प्रोत्साहित करीत असतात. असे त्यांचे विविध उपक्रम पाहून व समाजासाठी लढण्याची तळमळ पाहून त्यांचे कार्य बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असे निवेदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवान नानासाहेब डोंगरे यांनी केले. लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, मोहनीराज गटणे, डॉ. सुदर्शन गोरे, सावता माळी युवक संघाचे दीपक साखरे व सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
तुपे यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याने राज्याचे माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर, जिल्हा परिषद सदस्य सुभाषरावजी पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांकडून अभिनंदन होत आहे.