छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब फुल देऊन स्वागत

विजय चिडे/पाचोड : शासनाच्या आदेशानुसार सोमवार पासून शाळेचे दरवाजे उघडण्यात आले आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. थेरगाव (ता.पैठण) थेरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कालपासूनच निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, तरी प्रत्यक्ष सोमवार, ४ रोजी शाळा भरली असून शाळेत हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख बळीराम भुमरे यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पुस्तके वाटप करून स्वागत करण्यात आले आहे. तर यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब उबाळे, मुख्याध्यापक विलास गोलांडे, साधना चक्रे, कांचन लेंभे, वर्षा नवथर, सरोज हांडे, सारिका सूर्यवंशी, सुरेखा काळे,भारती शेवाळे आदी उपस्थित होते.

शासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी देखील पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास फारसे उत्साहित नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोमवारी संपूर्ण परिसरामध्ये विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद दिसून आला आहे. पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांच्या संख्येपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या कमी प्रमाणात होती. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आले. शाळेच्या मुख्य गेट वरती सँनिटाझर व थर्मस गन ठेवण्यात आली होती. शाळा सुरू झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या जरी कमी असली तरी देखील थोड्या दिवसात शंभर टक्के उपस्थिती राहील अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिक्षकांसह पालकांची उपस्थिती होती.

शासनाने दिलेल्या सर्व नियमांची पालन करून तसेच संपूर्ण शाळा निर्जंतुकीकरण करून शाळेत मध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मास द्वारे तपासणी, त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातावरती सनी टायझर, व शाळेत येतानी मास्क लावण्याची शक्ती आम्ही केली आहे. आज पहिला दिवस चांगल्या टक्केवारी ने विद्यार्थी उपस्थित होते.

विलास गोंलाडे, मुख्याध्यापक (थेरगाव)

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button