छत्रपती संभाजीनगर

मुरदारे यांंच्या वाढदिवसानिमित्त राबविले विविध सामाजिक उपक्रम


विलास लाटे/पैठण :  स्वाभिमानी छावा मराठा संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे यांंच्या वाढदिवसानिमीत्त विविध सामाजिक उपक्रम राबवुन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यामध्ये रक्तदान शिबीर घेऊन २३ रक्तदात्यांनी रक्तदान तर २५ जणांनी शुगर टेस्ट केले. बिडकीन ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप केले. अंगणवाडी क्र.३ व ९ मध्ये चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपन, टाकळी अंबड येथिल प्रवाह अनाथालयात जिवनावश्यक वस्तु देण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी मनोज पाटील मुरदारे यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील, अप्पासाहेब कुढेकर, जि.प.सदस्य विजय चव्हाण, राहुल पाटील, नगरसेवक फेरोजभाई सय्यद, आस्लमभाई सय्यद, सागर फरताळे, सचिनदेवा जोशी, विलास औटी, किरण काळे, नवनाथ चौधरी, संतोष अनिल संदनसे, नरवडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button