छत्रपती संभाजीनगर

बहुजन समाजाने शासनकर्ती जमात बनावे : लखन चव्हाण

 
विलास लाटे/पैठण :  बहुजन समाजाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विसर पडू न देता कामे करावे बहुजन समाजाने शासनकर्ती जमात बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत बहुजन मुक्ती पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष लखन चव्हाण यांनी व्यक्त केले पैठण येथे बहुजन मुक्ती पार्टीचे युवा आघाडीच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते

याप्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष नंदू भाऊ खोतकर यांनी आपल्या पक्षाचे ध्येय धोरणा विषयी माहिती दिली व तसेच पैठण तालुका अध्यक्ष नंदू गरुटेंनी गाव तिथे शाखा स्थापन करण्यात येतील व येणाऱ्या काळात पैठण तालुक्यांमध्ये बहुजन मुक्ती पार्टी चा आमदार होईल अशी ग्वाही दिली तसेच यावेळी ॲड. शिरीष कांबळे आपले विचार मांडताना म्हणाले की भाजप काँग्रेस हे दोन्ही पक्ष भांडवलदार व उद्योगपती यासाठी काम करत असून बहुजन मुक्ती पार्टी एकमेव पार्टी अशी आहे की बहुजन समाजासाठी काम करते.  

यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम पाटील मिसाळ , भारत मुक्ती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर मगरे, पैठण तालुका उपाध्यक्ष भीमा येळे, तालुका चिटणीस शांतिवन पारखे ,तालुका कोषाध्यक्ष जयहरी बांगरे, किशोर मिसाळ ,भारत ताकवाले ,आयाज सय्यद ,ज्ञानेश्वर जाधव, दादासाहेब थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button