छत्रपती संभाजीनगर

रस्त्याच्या अभावी महीलेची वाटेतच प्रसुती..

◾केकत जळगाव येथील घटना

◾महिलेनी दिला गोंडस मुलीला जन्म; आईसह बाळही सुखरूप

विजय चिडे/पाचोड :  पैठण तालुक्यातील केकत जळगाव मधील भगावन नगर वस्तीवर येथील एका महिलेला रूग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रस्त्यातच महिलेची प्रसुती झाल्याची घटना शनिवारी (दि.२)रोजी सकाळी नउच्या दरम्यान घडली असुन कोमल सोमनाथ थोरे असे त्या महिलेचे नाव आहे.

अधिक माहीती अशी की, केकत जळगाव येथील भगवान नगरवस्ती वरील कोमल थोरे यांना सकाळी प्रसूती वेदना व्हायला लागल्या. पोट दुखत असल्याने दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता व्यवस्थीत नव्हता शुक्रवारी मध्ये रात्री रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला आहे. भगवान नगर येथील ग्रामस्थ व महिला नेहमी गावात येण्यासाठी पायीच प्रवास करतात. तसेच एखाद्या आजारी व्यक्तीला रूग्णालयात न्यावयाचे झाल्यास बैल गाडीतून न्यावे लागते. परिणामी आजारी माणसाला दवाखान्यापर्यंत नेणं जिकरीचे होऊन बसतं. शनिवारी (दि.२)सकाळी येथील कोमल थोरे या गर्भवती महिलेला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. परंतु इतक्या सकाळी पायवाटेने आणि आडवाटेने दवाखान्यापर्यंत नेणार कसं, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. 

त्यामुळे बैल गाडीतून ही एक ते दिड किलोमीटर वाट पार करायची होती. दरम्यान या महिलेची वाटामध्ये प्रसुती झाली. वाटेतच प्रसुती झाल्याने महिलेस मोठा त्रास सहन करावा लागला. या वस्तीवर तीस पस्तीस कुंटुंब राहत असुनही या नागरिकांपर्यंत रस्ता पोहोचला नाही, त्यामुळे या वस्तीवरील गरोदर मातांची व रुग्णांच्या समस्या संपण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे येथिल ग्रामस्थांना रस्त्याची प्रतीक्षा कायम आहे. या रस्त्याअभावी गरोदर महिलांचे व रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. रस्तेच नसल्याने त्याचा फटका आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button