कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या दोन वाणांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 35 पीक वाणांचा लोकार्पण कार्यक्रम संपन्न…
राहुरी विद्यापीठपर्यावरणीय अनुकुलता कृषि विकासाकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते देशभरात संशोधीत केलेल्या 35 पीक वाणांचा राष्ट्रीय स्तरावर लोकार्पण कार्यक्रम पार पडला.

सदरचा कार्यक्रम महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र तसेच कृषि विद्यापीठांतर्गत 10 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणारे विविध महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्र या ठिकाणी आयोजीत करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील हे नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात तर संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख हे कृषि विज्ञान केंद्र, धुळे या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तर राहुरी कृषि विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ उपस्थित होते.

पंतप्रधानांनी आज लोकार्पण केलेले 35 पीक वाण हे तण सहनशील, जास्त उत्पन्न देणारे तसेच आरोग्यास पोषक असणार्या अशा विविध पिकांच्या वाणांचा समावेश यात आहे. विशेष महत्वाचे म्हणजे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीने प्रसारीत केलेल्या ज्वारी पिकाच्या फुले अनुराधा व एस.एस.एच. 47 या दोन वाणांचा समावेश यामध्ये आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button